आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: साईबाबांच्या शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्साहात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- साईंचे समाधीचे पाद्यपूजा - Divya Marathi
- साईंचे समाधीचे पाद्यपूजा

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त समितीच्या वतीने सोमवारी ( ता. 22 ) गुरू पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी समितीचे अध्‍यक्ष व मुख्‍य जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी व त्यांची पत्नी अनुराधा कुलकर्णी यांच्या हस्ते साईबाबांचे पाद्य पूजन करण्‍यात आले.

साईसच्चरित या ग्रंथाचे पारायणाची समाप्तीच्या निमित्ताने साईंच्या प्रतिमेची व पोथीची व्दारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्‍यात आली.मिरवणूकीत जयंत कुलकर्णी, संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. यशवंतरात माने, पुजारी उपेंद्र पाठक यांचा सहभाग होता. उत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. मंगळवारी ( ता. 23 ) गुरूपौर्णिमा उत्सवाची सांगता होणार आहे.