आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साईसमाधी शताब्दी महाेत्सवात जगातील विश्वस्तांचा सहभाग’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी : जगभरातील मंदिरांच्या विश्वस्तांनी साईबाबांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून विश्वस्तांचे मार्गदर्शन साईसमाधी शताब्दी महोत्सवाकरिता घेण्यात येईल, त्यांना कार्यक्रम नियाेजनात सहभागी करून घेतले जाईल, असे प्रतिपादन संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केले. या चर्चासत्रात जगभरातून ४३ साईमंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते.
साईबाबा संस्थानच्या वतीने परदेशातील साईमंदिर विश्वस्तांचे चर्चासत्र शिर्डीतील हॉटेल सेंट लॉरेन्स येथे नुकतेच झाले. त्या वेळी डॉ. हावरे बोलत होते. संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सचिन तांबे, अॅड. मोहन जयकर, प्रताप भोसले, भाऊसाहेब वाकचौरे, बिपिन कोल्हे, डॉ. चंद्रभान सतपथी (गुरुजी), नारायणबाबा व जगभरातील साईमंदिरांचे विश्वस्त या वेळी उपस्थित होते.
कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. सुरेश हावरे म्हणाले, जगभरातील अनेक साईभक्तांनी संपूर्ण जीवन साईबाबांच्या प्रचार व प्रसारास वाहून घेतले आहे. त्यांचे कार्य व अनुभवामुळे आम्हाला प्रेरणा व मार्गदर्शन मिळत आहे.
शिर्डी शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने भव्य असा घनकचरा प्रकल्प उभारण्याची कार्यवाही विश्वस्त मंडळाने सुरु केली असून १ जानेवारी२०१७ पासून प्रसादालयात मोफत प्रसाद भोजन देण्यात येणार अाहे.
शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमात जगभरातील सर्व मंदिरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ.हावरे यांनी केले. विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रास्ताविक केले. अॅड. मोहन जयकर यांनी उपस्थितांचे अाभार मानले.

अमेरिकेतील विश्वस्तांसह अनेकांनी व्यक्त केेले मनाेगत : अाॅस्ट्रेलियातील कॅनेबरा येथून श्रीमती अनिथा कंदुकुरी, अमेरिकेतील न्यू जर्सी येथून राज व्यासभट्टू, हाॅलंडमधून डॉ. ई. बी. प्रेमदानी, श्रीलंकेतून एस. यू. नायाहान, कॅनडातील ओन्टाररियोचे सिन्हा यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...