आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात समाजमंदिरे किती?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जि. प. समाजकल्याण विभागामार्फत समाजमंदिरांकरिता पुस्तकखरेदीसाठी दहा लाख खर्च होतो, परंतु या विभागातील अधिकार्‍यांना समाजमंदिरांची संख्या ठाऊक नाही, तसेच वाटलेल्या पुस्तकांच्या सद्य:स्थितीचीही माहिती नाही.

समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या जातात. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार दलित वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये समाजमंदिरे आहेत. या समाजमंदिरांत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. पुस्तके खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद आहे. दरवर्षी 100 समाजमंदिरांसाठी पुस्तके खरेदी केली जातात. परंतु समाजमंदिरांची संख्या विचारली असता, अधिकार्‍यांनी संख्या माहिती नसल्याचे सांगितले. वाटलेल्या पुस्तकांच्या सद्य:स्थितीबाबतही माहिती नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

माहिती गोळा करू..
मागील वर्षी पुस्तक खरेदीसाठी दहा लाख खर्च करण्यात आला. याही वर्षी पुस्तक खरेदीसाठी तरतूद आहे. या पुस्तकांचे गटविकास अधिकार्‍यांमार्फत वितरण केले जाते. जिल्ह्यातील समाजमंदिरांची संख्या उपलब्ध नसली, तरी त्याची माहिती संकलित करण्यात येईल.’’ प्रदीप भोगले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी