आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sambaji Brigade Manage Signature Campaign For Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडची स्वाक्षरी मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे सह्यांची मोहिम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातून एक लाख सह्या जमा करुन तहसीलदार, जिल्हाधिकार्‍यांमार्फत मराठा आरक्षण समितीला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिली.

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे पाठपुरावा करण्यात येत आहे. 4 एप्रिलच्या मुंबईतील मोर्चानंतर सरकारने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. तत्पूर्वी राज्य मागासवर्ग आयोग, बापट आयोग, रेणके आयोग यांनी अभ्यास करुन मराठा समाजाच्या परिस्थितीतीबाबत अहवाल सादर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणार्‍या निवेदनावर प्रत्येक तालुक्यातून नागरिकांच्या सह्या घेण्यात येणार आहेत. जिल्हाभरातून एक लाख सह्यांचे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकार्‍यांमार्फत राणे समितीकडे पाठवण्यात येणार आहे. मराठा सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या बैठकीला अजय बारस्कर, अतुल लहारे, निलेश आरडे, अवधुत पवार, चंद्रभान ठुबे, शरद जोशी, प्रविण भोर, उमेश अनभुले, अफसर शेख, विजय खेडकर, विकास शिर्के, निलेश बोरुडे, सागर फडके उपस्थित होते.