नगर - मराठा समाजाला शिक्षण व नोक-यामंध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाबद्दल संभाजी ब्रिगेडने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पेढा भरवून आभार मानले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगर जिल्ह्याच्या दौ-यावर पहिल्यांदाच आलेल्या पवार यांची भेट घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी चर्चा केली. त्यांना पेढा भरवून आभार मानण्यात आले.
मुस्लिम समाजालाही आरक्षण दिल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, अतुल लहारे, गोरख दळवी, अरविंद गेरंगे, सागर फडके, विजय खेडकर, कैलास पठारे, संदीप गायकवाड, अमोल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाला दिलेले आरक्षण केवळ राज्यापुरते मर्यादित राहणार आहे. व्यापक व देशभरात लाभ मिळण्यासाठी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही पवार यांच्याकडे करण्यात आली.