आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी न्यायमूर्ती, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष संभाजी पाटील म्हसे यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संभाजी पाटील म्हसे (७२) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने औरंगाबादेतील रुग्णालयात निधन झाले. रविवारी नगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, दोन मुली, भाऊ अॅड. विवेक म्हसे असा परिवार आहे. सरकारने त्यांची राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. गरजू लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून ते अभ्यास करत होते.
बातम्या आणखी आहेत...