आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात तंबाखू सिगारेटवर बंदी आणा, संभाजी सतरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राज्यात तंबाखू सिगारेटवर बंदी आणावी किंवा १०० टक्के कर लावावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना संभाजी सतरकर. )
नगर- राज्यात तंबाखू सिगारेटवर बंदी आणावी किंवा १०० टक्के कर लावावा, अशी मागणी बीएसएनएल वरिष्ठ उपमंडल अधिकारी तथा गेवराई (ता. नेवासे) येथील संत ज्ञानेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी सतरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली.

कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनादरम्यान सतरकर यांनी हे निवेदन दिले, तसेच यापूर्वी पाठवलेल्या पत्रांची दखल घेण्याची विनंती केली.
निवेदनात सतरकर यांनी म्हटले आहे की, मी आतापर्यंत राज्यात तंबाखू सिगारेटवर बंदी आणावी यासाठी तुमच्यासह (मुख्यमंत्री), आरोग्यमंत्री, पंतप्रधान, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांना पाच पत्रे पाठवली आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात मुंबईतील ३५ टक्के पोलिसांना तंबाखू सिगारेटच्या सेवनाने कर्करोगाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात तंबाखू सिगारेटवर फक्त १२.५% कर असल्याने जास्त लोक तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात. त्यामुळे कॅन्सरग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारने तंबाखू सिगारेटवर बंदी आणावी किंवा १०० टक्के कर लावावा, जेणेकरून लोकांमधील तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कमी होऊ शकेल.
त्यांचे पुनर्वसन करा
तंबाखू सिगारेटची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना राज्य शासनाने नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करून रोजीरोटी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही यावेळी सतरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
बातम्या आणखी आहेत...