आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाण्यांच्या सारखेपणामुळे ग्राहकांची व व्यापा-यांची फसगत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चलनात आणलेल्या एक व दोन रुपयांची नाणी ही पूर्वी चलनात असलेल्या पन्नास व एक रुपयांच्या आकाराची व दिसायलासुद्धा सारखीच असल्याने ग्राहकांची व व्यापा-यांची मोठी फसगत होते.
गेल्या काही वर्षांपासून झालेली नाण्यांची टंचाई दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक व दोन रुपयांची नाणी चलनात आणली. या नाण्यांचे स्टेट बँकेच्या वतीने बाजारात वितरण करण्यात आले. त्यामुळे ब-यापैकी नाणे टंचाई कमी झाली असली तरी नव्या नाण्यामुळे गोंधळ मात्र झाला आहे. नवीन नाण्यांपैकी एक रुपयांचे नाणे हे सध्या चलनात असलेल्या पन्नास पैशांच्या नाण्याच्या आकाराचे असल्याने ग्राहकांची फसगत होते. वृद्ध ग्राहक किंवा दुकानदार असेल तर पन्नास पैसे देताना एक रुपयांचे नाणे दिले जाते. काहीसा असाच प्रकार गेल्या वर्षी चलनात आणलेल्या दोन रुपयांच्या नाण्याबाबतही घडतो. जे दोन रुपयांचे नवीन नाणे आहे ते आकाराने सध्याच्या चलनात असलेल्या एक रुपयांच्या नाण्यासारखेच आहे. पूर्वीपासून चलनात असलेले दोन रुपयांचे नाणे हे आकाराने मोठे असले तरी ही नवीन दोन रुपयांचे नाणे हे पूर्वीच्या एक रुपयाच्या आकाराचे आहे. त्यामुळे ग्राहकाला एक रुपया देताना एक ऐवजी दोन रुपये दिले जातात.
ग्राहकांना नाहक भुर्दंड - एक व दोन रुपयांची नाणी सारखीच असल्याने ग्राहकांची फसगत होत असतानाच जे दोन रुपयांचे नवीन नाणे आहे. ते फोन लावण्यासाठी कॉईन बॉक्समध्ये टाकले तर फोन करता येतो. मात्र, ग्राहकांना नाहक भुर्दंड बसतो.
ग्राहकांचा उडतो गोंधळ - बाजारात सध्या जे एक व दोन रुपयांचे नाणे आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा गोंधळ होतो. नाणे निरखून पाहिल्याशिवाय नाणे देता व घेता येत नाही. त्यामुळे वृद्धांची ही मोठी कुचंबणा होते.’’ धनंजय रोडी, ग्राहक.