आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संपदा’चे ठेवीदार आज राळेगणसिद्धीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बहुचर्चित संपदा पतसंस्थेचा संस्थापक ज्ञानदेव वाफारेच्या गैरव्यवहारांचा पाढाच ठेवीदार शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमोर वाचणार आहेत. वाफारेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्‍या मंत्र्यांनाही खडे बोल सुनावण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख अँड. नीळकंठ सोले यांनी गुरुवारी दिली.

ठेवी परत मिळवण्यासाठी अण्णांची मदत घेण्याकरिता ठेवीदार शुक्रवारी राळेगणसिद्धीला जाणार आहेत. ठेवीदार बचाव कृती समितीच्या वतीने अण्णांना ‘जनमहात्मा’ ही पदवीही यावेळी देण्यात येईल. सहकार खात्यात सुधारणा होण्यासाठी अण्णांनी आंदोलन केले होते. आंदोलनाची फलर्शुती म्हणून सहकार कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. जळगाव, धुळे, कोल्हापूर जिल्ह्यांतील पतसंस्थांमध्ये ठेवी अडकलेल्यांना अण्णांमुळेच दिलासा मिळाला. त्यामुळे संपदाच्या ठेवीदारांनाही अण्णांची मदत हवी आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवून वैतागलेले ठेवीदार शेवटी अण्णांना साकडे घालणार आहेत. वाफारेच्या दुर्लक्षामुळे वीस हजार ठेवीदारांचे 32 कोटी रुपये संपदा पतसंस्थेत अडकले आहेत. पारनेर व नगरमधील हे ठेवीदार आहेत. जिल्ह्यातील ठेवीदारांच्या प्रo्नात लक्ष घालून अण्णा संबंधित यंत्रणांना धारेवर धरतील अशी अपेक्षा बाळगून ठेवीदार राळेगणसिद्धीला जाणार आहेत. अण्णा ठेवीदारांच्या प्रo्नावर कोणती भूमिका घेतात याकडे केवळ ठेवीदारच नव्हे, तर गैरव्यवहाराचा आरोप असणारे संचालक मंडळ व प्रशासकीय यंत्रणाही लक्ष ठेवून आहे.