आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन संचालकांवर अजूनही कारवाई नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळावर कलम ८८ नुसारच्या कारवाईला गेल्या तीन महिन्यांपासून मुहूर्त मिळालेला नाही. उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे ही कारवाई पूर्वीच दोन वर्षे लांबली असून कारवाईला मुहूर्त मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये संताप आहे, तर लांबलेल्या कारवाईचा फायदा घेत मालमत्तांची परस्पर विल्हेवाट लावण्याचे प्रकार संचालकांकडून घडत आहेत.
संपदा पतसंस्थेचा तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे संचालक मंडळाविरोधात सहकार विभागाने सहकार कायदा कलम ८८ नुसार जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई सुरू केली होती. यात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. कलम ७२ नुसार त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिल्याने ही कारवाई दोन वर्षे "जेसै थे' अवस्थेत होती. आठ महिन्यांपूर्वी संस्थेवर आलेल्या अवसायक मंडळाने यासंदर्भात पाठपुरावा केला. दुसरीकडे ठेवीदारांकडूनही सातत्याने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मागणी सुरू होती.
खंडपीठाने तीन महिन्यांपूर्वी कलम ८८ नुसारच्या कारवाईवरील स्थगिती उठवली. त्यानंतर तातडीने कारवाईला सुरुवात होण्याची आवश्यकता होती. मात्र, काहीही झाले नाही. स्थगिती मिळताना थांबलेली कारवाई पुढे नेण्याची जबाबदारी राहुरीचे सहायक उपनिबंधक एस. पी. तांदळकर यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, ते निवडणुकीत व्यग्र असल्याने त्यांनी पदभारही स्वीकारला नव्हता. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी पदभार स्वीकारून कागदपत्रे ताब्यात घेतली. मात्र, पुढील कारवाईसाठी अजून प्रतीक्षा आहे.
गैरव्यवहारप्रकरणी संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मालमत्ता विक्रीतून संस्थेचे नुकसान भरून घेण्याची ही कार्यवाही आहे. कारवाई लांबत चालल्याने तत्कालीन संचालक मंडळाने आपापल्या मालमत्तांची परस्पर विल्हेवाट लावली असून कारवाईतून फारसे हाती लागू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आता, तरी सहकार विभागाने तातडीने कारवाई करून ठेवीदारांना छळणाऱ्या संचालकांच्या मालमत्ता विक्रीतून ठेवीदारांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
तातडीने कारवाई होणे अत्यंत आवश्यक
-संचालकांवरतातडीने कार्यवाहीला सुरुवात करायला हवी होती. सहकार विभागाचे अधिकारी साथ देत नसल्याने पुरेसा वेळ देता येत नसल्याचे अवसायक मंडळाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. तातडीने कार्यवाही पुढे सरकली असती तर संबंधितांना मालमत्तांचा विल्हेवाट लावण्याचा कालावधी मिळाला नसता.” काकाकोयटे, अवसायकमंडळाचे माजी प्रमुख.