आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाचे समतादूत करणार सामाजिक सलोखा जागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, बार्टी अंतर्गत समतादूत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सामाजिक सलोखा राखणे, जातीय दुर्भावना नष्ट करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात वीस समतादूतांची निवड करण्यात आली आहे. हे समतादूत प्रत्येक तालुक्यातील गावांमधील ग्रामसभेत, शाळा-महाविद्यालये, बचत गट, दलित वस्त्या अशा विविध ठिकाणी जाणीव जागृती प्रबोधनाचे काम करणार आहेत. जिल्ह्यातील अत्याचारांचे प्रमाण, जातीय दुर्भावनेमुळे दूषित झालेले वातावरण तणाव, अशा पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा रुजवण्यासाठी समतादूतांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, अशी माहिती बार्टीचे सहायक प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांनी दिली.
जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये, शाळा, महाविद्यालयांत पथनाट्ये, व्याख्याने, पत्रके, कार्यशाळा, प्रशिक्षण या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...