आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूमाफियांचा महसूल पथकावर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - मुळा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणार्‍या डंपरचा पाठलाग करणार्‍या तहसीलदार दादासाहेब गिते व त्यांच्या सहकार्‍यांवर वाळूमाफियांनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (12 नोव्हेंबर) मध्यरात्री दीड वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील शिंगवे गावाच्या वेशीजवळ घडली. याप्रकरणी दोन चालक व डंपरसह तीन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. अन्य तीन वाहने पळून जाण्यात यशस्वी झाली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोरून चोरीच्या वाळूचे डंपर नगरकडे जाणार असल्याची माहिती तहसीलदार गिते यांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी दोन पथकांसह सापळा रचला. गिते शासकीय वाहनाऐवजी इंडिका (एमएच 16 एजे 711) स्वत: चालवत होते. त्यांनी वाळूचा डंपर (एमएच 16 एएम 3011) चालक सुनील दगडू हाटेकरसह (22, रा. नांदगाव, ता. नगर) ताब्यात घेतला. दुसरा डंपर व त्याच्यामागे असलेल्या कारला त्यांनी थांबण्याचा इशारा केला, पण ही वाहने भरधाव निघून गेली. गिते यांनी डंपरचा पाठलाग सुरू केला. डंपरचालकाने गिते यांच्या कारला शिंगवे गावाच्या वेशीजवळील गतिरोधकाजवळ जोरात धडक दिली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. तहसीलदारांच्या पथकाने नंतर वाळू खाली करत असताना डंपर (एमएच 16 ए वाय 2711), त्याचा चालक संदीप बबन बर्डे (22, देहरे) व कारचालक भारत भाऊसाहेब शेंडगे (राहुरी खुर्द) यांना ताब्यात घेतले.