आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूतस्कराकडून पोलिसाची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव - मुंगी-बोधेगाव रस्त्यावरील हातगाव चारी क्रमांक आठवरील मुख्य कालव्याजवळ पोलिस कर्मचारी दीपक रावसाहेब कोलते (३२) यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान घडली. ही हत्या वाळूतस्कराने केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या जिल्ह्यात वाळूतस्करांचा मोठ्या प्रमाणात उच्छाद सुरू असून त्यात पोलिसाचा बळी गेला. याप्रकरणी वाळूतस्करांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. रात्री उशिरा पोलिस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.