आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवैध वाळू वाहतूक; 75 वाहनांवर कारवाई, 29 जणांविरुद्ध गुन्हे; 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - गोदावरी नदीपात्रातून होणार्‍या अवैध वाळूउपशाला पायबंद घालण्यासाठी महसूल यंत्रणेने कारवाई सुरू केली आहे. तहसीलदार इंदिरा चौधरी यांनी आतापर्यंत 75 वाहनांवर कारवाई करून 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. दरम्यान, शनिवारी (21 जून) टाकलेल्या छाप्यात 15 ब्रास वाळूसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींवर गुन्हे दाखल केले गेले.
जेऊर पाटोद्याचे कामगार तलाठी बन्सी नाथा पवार, कोळगाव थडीचे कामगार तलाठी अशोक माळी, माहेगाव देशमुखचे भास्कर घनघाव यांच्या फिर्यादीवरून इसाक हुसेन पठाण (बेलगाव, ता. येवला), संतोष क्षीरसागर (देवठाण, ता. अकोले), अनिल शिरसाठ (मुसळगाव, ता. सिन्नर), संदीप आष्टेकर (चेहडी, जि. नाशिक) मच्छिंद्र वान वलवे (लासलगाव ता. येवले) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांत पोलिस व महसूल यंत्रणेने नदीकाठी ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यांत जेऊर पाटोदा येथून (एमएच-15 एजी-263) ढंपर - 4 ब्रास वाळू, कोळगाव थडी (एमएच- 15 ई-6115), 4 ब्रास वाळूसह ढंपर, माहेगाव येथील (एमएच-15 डीके -7651), ढंपर 4 ब्रास वाळूसह 32 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.
ज्या ठिकाणी वाळू लिलावास सरकारी परवानगी आहे, तेथील वाळू उपसण्यासाठी दिवस अन् रात्री नदी पात्रात मोठी गर्दी दिसते. ठरावीक वाळूसाठ्यापेक्षा अनेकपटींनी वाळू उपसा होत आहे. अन्य ठिकाणी तर याची गणतीच नाही. दुथडी नदीकाठच्या परिसरात वाळूतस्करांचे साम्राज्य आहे. गावागावात त्यांनी दहशत पसरवली आहे. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण असते.

वाळूतस्करांना थोपवण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासन गावागावात ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीची अपेक्षा करत आहे. मात्र, वाळूतस्करांविरोधात माहिती देणाºया यंत्रणेला मदत करण्याºया नागरिकांनाच जीवे मारण्याच्या धमक्या वाळूतस्करांकडून मिळत आहेत. त्यामुळे महसूल अधिकाºयांना मदत करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिंगणीकरांचे उपोषण
दहशत पसरवणाºया वाळूतस्करांवर कारवाई व्हावी, वाळूउपसा बंद व्हावा या मागणीसाठी तालुक्यातील हिंगणीचे ग्रामस्थ एक जुलैला तहसील कचेरीसमोर उपोषण करणार आहेत.