आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूचा ट्रॅक्टर पकडणाऱ्या तलाठ्याला मारहाण, कौठे बुद्रूक येथे घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडल्याने तलाठ्याला वाळू तस्करांकडून मारहाण करण्याची घटना गुरुवारी (१४ एप्रिल) सायंकाळी कौठे बुद्रूक येथे घडली. मारहाण करणाऱ्या वाळूतस्करांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तलाठी रामदास मारुती पिचड यांनी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुळा नदीपात्रातून वाळू नेणारा एक ट्रॅक्टर पकडला.
परवान्याची मागणी केली असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितले. त्यावर पिचड यांनी संबंधिताना ट्रॅक्टर मागोमाग घेण्यास सांगितले. यावेळी आरोपी किसन रामदास तांगडकर आणि शरद तांगडकर यांनी "तू कोण आम्हाला विचारणारा, तुझा काय अधिकार?' अशी दमबाजी करत शिवीगाळ मारहाण केली, अशी तक्रार तलाठी पिचड यांनी शुक्रवारी सकाळी घारगाव पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरुन आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, शिवीगाळ करुन दमबाजी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनिल नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गोरख शिंदे या घटनेचा तपास करत आहेत.