आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन ब्रासपेक्षा जास्त वाळू वाहतुकीला मनाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दोन ब्रासपेक्षा जास्त क्षमतेने वाळू वाहतुकीला परवानगी देण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगत गौण खनिज वाहतूकदारांची अडीच ब्रासची मागणी प्रांताधिकारी रंगानायक यांनी सोमवारी धुडकावून लावली. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणा-यांविरुद्ध प्रांताधिकारी रंगानायक यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांपासून मोहीम सुरू आहे. नगर उपविभागात नगर-औरंगाबाद, नगर-पाथर्डी व नगर-मनमाड रस्त्यावरून जाणा-या अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहने सोडवण्यासाठी वाहतूकदारांची कार्यालयात गर्दी झाली आहे.
दंड वसूल करण्याच्या प्रक्रियेला सकाळपासूनच वेग आला होता. दरम्यान तेथे जमलेल्या वाहतूकदारांनी रंगानायक यांची भेट घेऊन चर्चा केली. आमच्याकडे सहा ते दहा टायरचे वाहन असून त्यांची क्षमता सुमारे चार ते सहा ब्रास वाहतुकीची आहे. दूरव्ांर वाहतूक करावी लागत असल्याने नियमाच्या चौकटीत असलेल्या क्षमतेने वाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे किमान अडीच ब्रास वाहतुकीस परवानगी द्यावी, अशी मागणी वाहतूकदारांनी केली. तथापि, रंगानायक यांनी नियमानुसार दोनच ब्रास वाळू वाहतूक करण्यास परवानगी असल्याचे सांगून वाहतूकदारांची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे वाहतूकदारांनी नाराजी व्यक्त केली.
आरटीओच्या नियमाप्रमाणे परवानगी द्यावी - दूरच्या वाहतुकीत डिझेल खर्च वजा जाता हातात काहीच पडत नाही. आरटीओने वाहनांसाठी ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार वाहतूक करण्यास परवानगी द्यावी. दोन ब्रास वाहतूक परवडत नाही.’’ - रायचंद वाखारे, वाहतूकदार.
तीन दिवसांत 23 वाहनांवर कारवाई - क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणा-या 23 वाहनांवर गेल्या तीन दिवसांत कारवाई करण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत सहा ब्रास वाहतूक करणा-या चार वाहनधारकांकडून सुमारे 1 लाख 18 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. येत्या दोन-तीन दिवसांत उर्वरित 19 वाहनधारकांकडून सुमारे अडीच लाख दंड वसूल केला जाईल.’’ - ए. एस. रंगानायक, प्रांताधिकारी.