आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनतगाव ग्रामस्थांनी पेटवून दिला वाळूचा ट्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - वाळूचोरी करणारा टेम्पो गस्त घालणार्‍या ग्रामस्थांच्या अंगावर घातल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाळूसह टेम्पो सोमवारी मध्यरात्री पेटवून दिला. यात लाख हजार रुपयांचे नुकसान झाले.

गेले काही दिवस पाचेगाव पुनतगाव येथे प्रवरा नदीतून वाळूतस्करी चालू आहे. ग्रामस्थांचा वाळू चोरीस विरोध असतानाही चोरी सुरूच आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना वाळूतस्करी करताना काही वाहने दिसली होती. वाळूचोरी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी गस्त सुरू केली होती, तरी त्यांना हुलकावणी देत वाळूचोरी चालूच होती. वाळूचोरांनी वाळूचे ढिगार आधीच तयार करून ठेवले होते. त्यामुळे दोन डंपर वाळू चोरीला गेली. ग्रामपंचायतीने वाळूचोरीच्या मार्गावर खड्डे खोदले होते. परंतु वाळूचोरांनी हे खड्डेही बुजवले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले.

वाळू चोरणार्‍या टेम्पोला ग्रामस्थ आडवे झाले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी टेम्पो पेटवून दिला. याप्रकरणी टेम्पोमालक चालक यांच्यासह टेम्पो पेटवणार्‍या अज्ञात ग्रामस्थांविरुद्ध पोलिस पाटील रंगनाथ पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस महसूल खात्याकडून या ठिकाणच्या वाळूचोरीकडे दुर्लक्ष झाले आहे. टेम्पो चालक मालक तसेच टेम्पो नंबरही यंत्रणेला माहिती असल्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.