आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा वाळूउपसा करणा-या वाळूतस्करांच्या वाहनांची तोडफोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासा - मुळा नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणा-या सहा वाहनांची निंभारी ग्रामस्थांनी तोडफोड केली. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रशासनाने वाळूतस्करांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
मुळा नदीपात्रात मध्यरात्री वाळूउपसा केला जातो. निंभारीच्या ग्रामस्थांचा वाळूउपशाला विरोध आहे. मंगळवारी मध्यरात्री वाळू उपसण्यासाठी 11 डंपर वंजाळपोई शिवारातून नदीपात्रात उतरले. ग्रामस्थांनी हे डंपर अडवले असता वाळूतस्करांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर एक हजार ग्रामस्थांचा जमाव घटनास्थळी आला. या जमावाने डंपर, मोटारसायकल, तसेच कारची मोडतोड करण्यास सुरूवात केली. अंधाराचा फायदा घेऊन काही वाळूतस्कर पाच डंपर घेऊन पळण्यात यशस्वी झाले. नंतर पोलिसांनी नदीपात्रातून सहा डंपर जप्त केले.
गुन्हे दाखल करणार - चोरीस गेलेल्या वाळूसाठ्यांचे पंचनामे केले असून वाळूउपसा करणा-या सहाजणांकडून दंडासह वाळूची किंमत वसूल करण्यात येणार आहे. डंपरचालकाविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. - भगवान आव्हाड, तहसीलदार