आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sandeep Kotkar Court Hearing Issue In Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संदीप कोतकरच्या अर्जावर सरकार पक्षाचे म्हणणे सादर; उद्या पुढील सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामिनासाठी घातलेली जिल्हाबंदीची अट शिथिल करण्याची मागणी करणार्‍या माजी महापौर संदीप कोतकरच्या अर्जाला विरोध करणारे म्हणणे सरकार पक्षाच्या वतीने बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आले. या अर्जावर सुनावणी मात्र होऊ शकली नाही. जिल्हा न्यायाधीश बी. यू. देबडवार यांच्यासमोर 30 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल.

महापालिका निवडणूक जवळ आली असून प्रभागातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाबंदीची अट शिथील करण्याची मागणी कोतकरच्या वतीने करण्यात आली आहे. या अर्जावर न्यायाधीश देबडवार यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी अर्जाला विरोध करणारे लेखी म्हणणे सादर केले. जिल्हाबंदीची अट जिल्हा न्यायालयानेच घातली असून आरोपीने उच्च न्यायालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. याच प्रकरणातील आरोपी शिवाजी कर्डिले यांनी उच्च न्यायालयाकडूनच जिल्हाबंदीची अट शिथील करुन घेतली आहे. त्यामुळे आरोपीचा अर्ज नामंजूर करण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली आहे.

अन्य आरोपी सुनील भोंडवे याच्या वतीने दोषारोपपत्रातून नाव वगळण्याची मागणी करणारा अर्ज करण्यात आला आहे. बुधवारी त्यावर सुनावणी झाली. भोंडवे केडगाव येथील हायस्कूलमध्ये शिपाई आहे. घटनेच्या दिवशी तो शाळेत होता. खुनाच्या घटनेशी त्याचा संबंध नसल्याचे म्हणणे आरोपीच्या वतीने मांडण्यात आले. यावर सरकार पक्षाने खुनाची घटना मे महिन्यातील असून शाळेला सुट्या होत्या. आरोपीने अर्ज करण्यास विलंब का केला? ओमिनी गाडीतून तीन-चार अज्ञात लोक आल्याचे फिर्यादीने बघितले आहे. भोंडवे या अज्ञातांपैकी एक आहे, असे म्हणणे सरकार पक्षाने मांडले.