आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरचा संभुस वाडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशवाईतील मोजकेच वाडे आता नगर जिल्ह्यात उरले आहेत. संगमनेर येथील बाजारपेठेत असलेला संभुस वाडा हा उत्तर पेशवाईतील काष्टशिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. या तीनमजली वाड्यावर, तसेच त्यासमोरील मालपाणी यांच्या इमारतीच्या दर्शनी भागावर गणपती, सरस्वती, श्रीकृष्ण, गरूड, मयूर या काष्टशिल्पांबरोबर पेशव्यांचेही लाकडात कोरलेले शिल्प पहायला मिळते. विशेष म्हणजे तिसऱ्या मजल्यावर मध्यभागी "कृष्णाजी रावजी संभुस' यांच्या इंग्रजी आद्याक्षरांतून तयार केलेली नक्षी आहे. सज्जाच्या खांबांच्या वरच्या बाजूला एका बाजूला अश्व आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला श्वानाची आकृती पहायला मिळते. धुळीमुळे ही शिल्पे थोडी खराब झाली आहेत. दहाव्या पिढीतील संजय विनायक संभुस आणि त्यांचा परिवार या वाड्यात राहतो.