आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sangamner Assembly Elections,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्‍यासाठी 81 जणांनी नेले 90 उमेदवारी अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- संगमनेर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी तीनजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात विरोधी पक्षांकडून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार हे शुक्रवारी स्पष्ट झाले नाही.
आतापर्यंत 81 जणांनी 90 उमेदवारी अर्ज नेले असल्याने शनिवारीच उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल. शुक्रवारी तब्बल 34 जणांनी उमेदवारी अर्ज नेले. यात भाजपचे राजेश चौधरी, मनसेचे डॉ. अरुण इथापे, सुनीता बेल्हेकर, राष्ट्रवादीचे आबासाहेब थोरात, दिलीप शिंदे, सरूनाथ उंबरकर, शौकत जहागीरदार, वैशाली राऊत, किरण घोटेकर, शिवसेनेचे जनार्दन आहेर, अमित नवले, अप्पा केसेकर, श्रीराज डेरे, भाकपचे डॉ. अनिल गुंजाळ आदींचा समावेश आहे. शुक्रवारी अण्णासाहेब सोपान दिघे (तळेगाव) यांनी व खंडू बाबाजी सातपुते (सुकेवाडी) यांनी अपक्ष, तर कालीराम पोपळघट (साकूर) यांनी भारतीय नवजवान सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.