आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangamner Durga Tambe Says Women's Role Important In Socity Development

‘शहर विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ऐतिहासिक व चळवळीची परंपरा असलेल्या नगर शहराचा विकास ठप्प झाला आहे. रस्ते, आरोग्य असे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवून शहर विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले.

शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे, शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आदी या वेळी उपस्थित होते. राजकारणाविषयी जनतेत असलेली नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी महिलांनी राजकारणात येण्याची आवश्यकता आहे. यातून राजकारणाची प्रतिमा उंचावेल असा आशावाद तांबे यांनी व्यक्त केला.

रजनी आमोदकर, संगीता पोटे, आरेफा शेख, डॉ. कांचन मोहिते, क्रांती बनकर, रेशमा थोरात, योगिता थोरात, सुमन साळवे, सविता डाके, सुमन पालके, संगीता साळवे, नाथा फालके, छाया झेंडे आदींनी या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.