आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार जाहीर; आरती दातार, प्रा. दिघे यांना साहित्य, बिडवेंना कलागौरव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - संगमनेर इतिहास संशोधन मंडळातर्फे देण्यात येणारे कवी अनंत फंदी साहित्य व कलागौरव पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले. डॉ. आरती दातार, प्रा. शंकरराव दिघे यांची साहित्य, तर संगमनेर येथील ज्येष्ठ सनईवादक व संगीततज्ज्ञ शिवराम बिडवे यांची कलागौरव पुरस्कारासाठी निवड झाली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी यांनी दिली. पुरस्कार वितरण 19 जानेवारीला सह्याद्री विद्यालयात दुपारी चार वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे.
कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे. शून्यातून सूर्याकडे (आत्मकथन) डॉ. आरती दातार (पुणे) व या शतकाचा सातबाराच होईल कोरा (दीर्घ कवितासंग्रह) प्रा. शंकरराव दिघे (लोणी) या साहित्यकृतींना 3,100 रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र देऊन गौरवण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे चरित्र बेलभंडारा - डॉ. सागर देशपांडे (पुणे), हत्ती इलो (काव्यसंग्रह) अजय कांडर, कणकवली, संताजी (कादंबरी) काका विधाते, कोल्हापूर, लावणी रंग आणि रूप (माहितीपर साहित्य) - सोपान कुडे, मोशी (पुणे) यांना 1 हजार 111 रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.