आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका ठेकेदारावर मेहेरबान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- नगरपालिका हद्दीतील गटारी स्वच्छ करण्याचा ठेका देऊनही संगमनेर पालिकेचे कर्मचारीच जेसीबीच्या साहाय्याने गटारे स्वच्छ करत असल्याचा प्रकार जागृत नागरिकांनी उघडकीस आणला. पालिका कर्मचाऱ्यांना याबाबत ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने विचारणा केली असता कर्मचारी काम बंद करून पुन्हा माघारी फिरले.
बुधवारी सकाळी जुना निमोण नाका परिसरातील हॉटेल करमजवळील पालिकेच्या टपऱ्यांच्या मागून जाणारी गटार पालिकेचे काही कर्मचारी जेसीबीने साफ करत असल्याचे दिसून आले. या परिसरातील व्यावसायिक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमोल खताळ यांनी संबंधितांना यासंदर्भात विचारणा केली असता आम्ही पालिकेचे कर्मचारी अाहोत. वरिष्ठांनी गटार साफ करण्यासाठी पाठवल्याचे त्यांनी सांगितले. यावर खताळ यांनी या कामाचा ठेका दिलेला असताना तुम्ही हे काम कसे करता अशी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना बोलावून घेतले. आरोग्य निरीक्षक अर्जुन हासे, पठाण, प्रशासनाधिकारी श्रीनिवास पगडाल हेही घटनास्थळी आले. नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना या सर्वांचीच धांदल उडाली आणि हे सर्वजण या कामावरील ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे समोर आले.
शहरातील गटारी साफ करण्याचा ठेका बी. आर. िक्लनिक या कंपनीला दिला आहे. ते केवळ बंदिस्त गटारी साफ करतात. उघड्या गटारी पालिका साफ करत आहे. ठेका दिलेला नाही. ठेकेदाराकडे गटारी साफ करण्यासाठी यंत्रणा नाही. ठेकेदाराला काम दिले असले, तरी कठीण प्रसंग उदभवू नये यासाठी आमचे कर्मचारी काम करत आहेत. अशी उत्तरे या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दिली. नंतर जेसीबीला काम निघाल्याचे सांगत गटार साफ करण्याचे काम थांबवण्यात आले. दरम्यान, सगळ्याच गटारी साफ करण्यासाठी ठेकेदाराला द्याव्या, असा नियम नाही. ठेकेदाराकडे काम करण्यासाठी माणसे नाहीत.
मुख्याधिकारी आल्यावर त्यांच्याशी बोला, असे आरोग्य निरीक्षक अर्जुन हासे यांनी सांगितले.ठेकेदाराला जे काम करायचे त्यासंबंधीची ऑर्डर दिली जाते. सध्या सुरू असलेले काम ठेकेदाराचे नाही. गटारीच्या कामाचा ठेका ठेकेदाराला दिलेला आहे, असे प्रशासनाधिकारी श्रीनिवास पगडाल यांनी सांगितले.
जेसीबीची नोंद काम झाल्यावर
शहरात अशा पद्धतीने जेसीबीच्या मदतीने अनेक कामे केली जातात. या कामाच्या जेसीबीच्या नोंदीदेखील काम झाल्यानंतर घेतल्या जातात. पालिकेतून कोणत्या कामासाठी जेसीबी नेत आहोत याची नोंद केली जात नाही, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.
आंदोलन करू
- चुकीचे काम करून पालिकेचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालणार असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना काळे फासेल. ठेका दिला असतानाही पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे चुकीचे आहे.''
अमोल खताळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष.
बातम्या आणखी आहेत...