आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरमध्ये पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना काँग्रेसचा घेराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - भंडारदरा,निळवंडेतून जायकवाडीसाठी पाणी सोडल्याचे पडसाद लाभक्षेत्रात उमटू लागले आहेत. जायकवाडीसाठीचा संगमनेर, अकोलेकरांचा विरोध तीव्र होऊ लागला असून मंगळवारी संगमनेरमध्ये शेतकऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
भंडारदरा, निळवंडे पाणी हक्क बचाव समितीच्या माध्यमातून मंगळवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्यापासून घुलेवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी अनिल देशमुख, काँग्रेसचे तालुकाप्रमुख बाबा आेहोळ, सुरेश थोरात, जगन्नाथ घुगरकर, दूध संघाचे अध्यक्ष रामनाथ राहाणे आदी उपस्थित होते. भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाण्याचे नुकसान करणाऱ्या शासनाचा धिक्कार करतानाच पाटबंधारे खात्याकडून होत असलेले पाणीवाटपाचे धोरण चुकीचे असल्याचे सांगितले. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना यावेळी घेराव घालण्यात आला. पाणी थांबवण्यासाठी माजी मंत्री, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.
आदेश हक्कावर वरवंटा फिरवणारा
-हाआदेश आमच्या हक्कावर वरवंटा फिरवणारा आहे. समन्यायी कायद्याच्या आधारे निर्णय घेतला असला, तरी तो चुकीचा आहे. याआधी पिण्यासाठी मानवतेच्या भूमिकेतून पाणी सोडले. जायकवाडीत पुरेसा साठा असताना आता उद्योगासाठी पाणी जात आहे.'' माधवरावकानवडे, अध्यक्ष,थोरात साखर कारखाना.

आैद्योगिक वसाहत, बिअरसाठी पाणी
-आपल्याहक्काचे पाणी जायकवाडीसाठी जाणे अन्यायकारक आहे. माणुसकीच्या भावनेतून गेल्यावेळी पिण्यासाठी पाणी दिले,आता हे पाणी आैद्योगिक वसाहती, बियर बारचे उद्योग टिकवण्यासाठी जाऊ दिले जाणार नाही. सर्वांची एकजूट आवश्यक आहे. '' दुर्गातांबे, नगराध्यक्ष.