आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास काय असतो, ते सत्ताधार्‍यांना आम्ही दाखवून दिले : संग्राम जगताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- फकिरवाडा परिसराचे नगरसेवक नसतानाही स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे यांनी या भागात विकासकामे केली. सत्ताधार्‍यांना विकासाची दिशा नाही. सत्ताधार्‍यांना विकास काय असतो, हे आम्ही दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी केले.

गाडे यांच्या प्रयत्नांतून फकिरवाडा परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा प्रारंभ मच्छिंद्र पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी जगताप बोलत होते. भास्कर पांडुळे, सूर्यकांत गाडे, दिलीप गाडे, आसाराम हरेर, बाळासाहेब शेळके, रवींद्र गाडे, हेमंत गिरवले, अँड. सतीश निंबाळकर, कैलास गाडे, अभिजित रासकर, भाऊसाहेब काकडे, सुनील पवार, राजेंद्र पवार, विनीत गाडे आदी या वेळी उपस्थित होते. जगताप म्हणाले, फकिरवाडा भागात महापालिकेच्या विशेष निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परिसराची शोभा वाढणार आहे. गाडे यांनी प्रभागात चांगली विकासकामे केली आहेत. सत्ताधार्‍यांना विकासाची दिशा नाही. त्यांना विकासाचा कसा काय कळवळा आला? असा सवाल त्यांनी केला. फकिरवाडा भागात लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केले. गाडे म्हणाले, फकिरवाडा भाग ग्रामपंचायतीत असताना या भागाचा चांगला विकास झाला.

मात्र, या भागाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर विकासाकडे दुर्लक्ष झाले.कल्पना जोशी, शोभा सुसे, सुमित कोठारी, आजूब सय्यद, राजू शेख, इल्लू जहागीरदार, आशा पाटोळे आदी या वेळी उपस्थित होते.