आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय कळमकरांसह दोघांचा अंतरिम अटकपूर्व जामीन कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अ‍ॅट्रॉसिटी विनयभंग केल्याप्रकरणी तोफखान्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शिक्षक नेते संजय कळमकर संजय कुलकर्णी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने कायम केला. जिल्हा न्यायाधीश ए. डी. तनखीवाले यांनी बुधवारी हा आदेश दिला.

राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे नेते कळमकर कुलकर्णी यांच्याविरुद्ध एप्रिलला तोफखाना पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला होता. शहरातील तपोवन रोडवर हा प्रकार घडल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. या गुन्ह्याचा तपास शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील यांच्याकडे आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय कळमकर कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानंतर अंतरिम जामीन कायम करण्याकरिता दोघांनीही अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांच्यामार्फत पुन्हा न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

फिर्यादी महिलेचा पती राहुरी तालुक्यात अधिकारी आहे. त्याच्या विरोधात कळमकर कुलकर्णी यांनी तक्रारी केलेल्या होत्या. त्यामुळे या अधिकार्‍याने पत्नीला पुढे करुन दोघांविरुद्ध खोटी फिर्याद दिली. दोघांनीही न्यायालयाच्या सूचनेचे पालन केलेेले आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन कायम करावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. सुद्रिक यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सतीश पाटील यांनी आक्षेप घेतला. पण, न्यायाधीश तनखीवाले यांनी कळमकर, कुलकर्णींचा अंतरिम अटकपूर्व जामीन कायम केला.