आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कल्पना दुधाळ यांना संजीवनी खोजे काव्य पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येथील कवयित्री संजीवनी खोजे स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा (कै.)संजीवनी खोजे काव्य पुरस्कार दौंड तालुक्यातील बोरी-भडक येथील कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पाच हजार रूपये स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २८ ऑगस्टला टिळक रस्त्यावरील तुषार गार्डनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येईल.
कवयित्री संजीवनी खोजे प्रतिष्ठानतर्फे सन १९९१ पासून दरवर्षीमराठीत साहित्य क्षेत्रात वेगळी वाट चोखाळणाऱ्या कवीस पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदा २६ वे वर्ष आहे. २०१६ च्या पुरस्कारासाठी कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या संग्रहाची निवड करण्यात आली.
परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवी तहसीलदार गणेश मरकड प्रा. रायभान दवंगे यांनी काम पाहिले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत मुथा यांनी पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार्थी दुधाळ यांचे प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ कवी केशव भणगे यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी दत्ता खोजे, दिलीप खोजे, आसाराम कावरे, अरविंद ब्राह्मणे, भूषण देशमुख, चंद्रकांत पालवे, प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, अमोल बागूल, जयंत येलूलकर, संजीव तनपुरे, दिलीप शहापूरकर, एम. पी. दिवाण आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळा २८ ऑगस्टला संकेत हॉटेलच्या तुषार गार्डनमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सदानंद मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

पुरस्कार वितरणाच्या मुख्य समारंभानंतर निमंत्रित जिल्ह्यातील कवींचे कविसंमेलन होणार आहे. जिल्ह्यात कवींनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहून कविसंमेलनाची रंगत वाढवावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

अदलाबदल
चरायला सोडलेल्या गुरांनी कचऱ्यात घुटमळणं आणि गोठ्याला बांधलेलं गवताचं तोरण डावलून प्लास्टिकच्या पिशव्यात काही नवखं खरमरीत शोधणं म्हणजेच असतं का जनावरांचं आधुनिक होणं?

बातम्या आणखी आहेत...