आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह: ‘संजीवनी’च्या २७ विद्यार्थ्यांना नोकऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत नव्याने २७ विद्यार्थ्यांची सुझलॉन, आदिती इरिगेशन सीमेन्स या नामंकित कंपन्यांनमध्ये निवड झाली, अशी माहिती प्राचार्य. डॉ. आर. ए. कापगते यांनी दिली.

आतापर्यंत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षातील ९९ विद्यार्थ्यांना संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नांमुळे विविध नामांकित कंपन्यामध्ये नोकरी मिळवून देण्यात आली आहे. नव्याने निवड विद्यार्थ्यांमध्ये प्रवीण बागल, प्रवीण गोर्डे, सचिन जाधव, आशीष केकाण, शरद मसाळ, अमोल नागरे, सागर निकम, अमोल उसरे, युवराज तराटे, व्यंकटेश झोंड, सागर डांगे, चैतन्य धनवटे, ऋषिकेश पुलाटे, विक्रम गणगे, ओंकार सुलाखे, संकेत नवले, नीलेश जाधव, आदित्य मांडगे, द्वारकेश आव्हाड, विजय गोर्डे, अक्षय गवळी, संतोष कांबळे, संदीप त्रिभुवन सौरभ राऊत या गुणावंतांचा समावेश आहे. या आधीही स्टर्लिंग अण्ड विल्सन, इंडिया बुल्स, पोलिबॉन्ड, एल अॅण्ड टी, बॉश, इटॉन, ग्लोबल प्रायव्हेट ली., एल जी आदी नामांकित कंपन्यांनी संजीवनीच्या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोकारीची गरज होती, त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संस्थेच्या ट्रेंनिग अण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नांनी नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे डॉ. कापगते यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. की संस्थेच्या ट्रेनिंग अण्ड प्लेसमेंट विभागाने त्यांच्याकडून मुलखतीचे तंत्र, देहबोली, हजर जबाबीपणा, इंग्रजी भाषेवरील प्रभृत्व, समूह संवाद नेतृत्व आदी बाबींची चांगली तयारी करुन घेतली. विभागाअंतर्गत विविध कंपन्यांना भेटी, तज्ज्ञांची व्याख्याने आदींच्या अायोजनमुळे आणि परिपूर्ण शिक्षणामुळे विविध कंपन्यांच्या कसोट्यांंना सामोरे जाताना काहीही अवघड वाटले नाही, असे त्यांनी नमूद केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्राचार्य. डॉ. कापगते , प्रा. आय. के.सय्यद यांनी यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आभिनंदन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...