आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकारांना पडलेले ‘सपान’ लघुपटाने पूर्ण; निर्माते घाडगे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर शहरात सध्या लघुपट निर्मितीला चांगले दिवस आले असून या क्षेत्राकडे युवकांचा कल वाढत आहे. शहरी ग्रामीण भागात विविध विषयांवर अनेक लघुपट तयार होत असून नगर आष्टी तालुक्यातील कलाकारांनी एकत्र येऊन ‘सपान’ लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे, अशी माहिती निर्माते संजय घाडगे यांनी नुकतीच दिली. 


आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथे संजय व्हिजनच्या ‘सपान’ लघुपट निर्मितीचा शुभारंभ उद्योजक कांतीलाला चनोदिया, चित्रपट निर्माते संजय घाडगे, सरपंच राजू गव्हाणे, मुख्याध्यापक मच्छिंद्र शेळके, गणेश कराळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ग्रामीण भागातील केरसुणी, झाडू तयार करणाऱ्या गरीब मुलाने शिक्षण घेऊन नाव कमवावे हे स्वप्न पाहणाऱ्या बापाचे ‘सपान’ वास्तवात मात्र येते का, हा प्रश्न ग्रामीण भागातील शिक्षण मुलांचा सध्याचा बदललेला कल यावर हा लघुपट आधारित आहे. 


यातील सर्व कलाकार ग्रामीण भागातील नवोदित असूनही त्यांनी मन लावून भूमिका केल्या आहेत. लवकरच हा लघुपट नगरकरांना पाहण्यास उपलब्ध होईल. या लघुपटात पूजा दुधे, संदीप अडागळे, गणेश अडागळे, मंगेश शिरसाठ, सुनील अडागळे, संगीता अडागळे यांनी काम केले असून फिल्म चित्रीकरण आकाश कांबळे बब्बू मनियार यांनी केले आहे. संकल्पना स्थिर चित्रीकरण संदीप कांबळे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील समस्या सामाजिक विषयावर जनजागृती करणारे लघुपट संजय व्हिजन निर्मितीतर्फे लवकरच करण्यात येणार आहेत. 

 

पिंपरखेड येथे संजय व्हिजनच्या ‘सपान’ लघुपट निर्मितीचा शुभारंभ उद्योजक कांतीलाल चनोदिया, चित्रपट निर्माते संजय घाडगे, सरपंच राजू गव्हाणे, मुख्याध्यापक मच्छिंद्र शेळके, गणेश कराळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...