आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sardar Babasaheb Mirikara Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभातफेरी, वृक्षारोपण आणि सोनेरी आठवणींना उजाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी ज्या निराधार, वंचित मुलांना आधार देण्यासाठी रिमांडहोम सुरू केले, त्याच वास्तूत त्यांच्या जन्मशताब्दीला बुधवारी प्रारंभ झाला. यानिमित्त मुला-मुलींनी सकाळी प्रभातफेरी काढली. नंतर वृक्षारोपण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सभा झाली.
समाजसेवक, इतिहास संशोधक, कुशल संघटक, तसेच संगीत रसिक असलेल्या सरदार मिरीकर यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्याची सुरुवात रामनाथ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेने झाली. प्रारंभी सरदार मिरीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. रिमांडहोममधील मुलांनी स्वागतगीत सादर केले. सत्यसाई सेवा समितीच्या वतीने अशोक कुरापाटी, तर आनंदी कट्टाच्या वतीने अनसूया बोराडे यांनी भजन म्हटले. प्रियंका गायकवाड, दिव्या भुमकर व इतर मुलांसह रामनाथ वाघ, रामराव चव्हाण, डॉ. रवींद्र साताळकर, रावसाहेब मिरीकर, अनिल क्षीरसागर, शरद क्यादर, यशवंत बागडे, मधुसूदन मुळे, कुतुबुद्दिन, सुधीर मेहता, शिल्पा रसाळ, प्रमोद मोहोळे आदींनी सरदार मिरीकर यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. नारायण गवळी यांनी वर्षभर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी सांगितले. आभार अ‍ॅड. गौरव मिरीकर यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. गोपाळराव मिरीकर, श्रीपाद मिरीकर यांच्यासह सर्व मिरीकर कुटुंबीय, रिमांडहोमचे पदाधिकारी व सेवक, तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
निरलस समाजसेवक
सरदार मिरीकर यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आयुष्यभर इतरांना मदत केली. इतक्या संस्था, संघटना उभ्या करूनही ते नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिले. मनुष्याचे जीवन कसे असावे, याचा आदर्शच त्यांना घालून दिला. त्यांचे जीवन म्हणजे नगरचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे, असे विविध मान्यवरांनी यावेळी सांगितले.