आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशांची शिकार; 7 जणांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - तालुक्यातील अस्तगाव येथे दहा संशाची शिकार करून त्यांचे मांस खाताना 7 जणांना ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी घडली.
अस्तगाव येथे काही जण रस्त्यावर मांसाची भाजी शिजवून खात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनपाल भरत पवार यांनी सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी 10 सशांची शिकार केल्याचे पुढे आले. मांस खाण्यासाठीच या सशांची शिकार केल्याचे या 7 जणांनी कबूल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
नाना गांगड, सुरेश गांगड, बारकू गांगड, इंद्रजीत दुधवडे, सोमनाथ जाधव, गोरख जाधव व सखाराम जाधव अशी अटक करण्यात आलेल्या 7 जणांची नावे आहेत. शुक्रवारी या 7 जणांना पारनेर न्यायालयात हजर केले असता आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी दिली आहे.