आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ससाणे-विखेंकडे १३, तर १० ग्रा. पं. मुरकुटे गटाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - तालुक्यातील१३ ग्रामपंचायतींवर ससाणे-विखे गटाचा, तर १० ग्रामपंचायतींवर मुरकुटे गटाचा झेंडा फडकला. तालुक्यात प्रथमच ग्रामीण स्तरावर निवडणूक लढवलेल्या भाजपच्या २६ सदस्यांच्या गळ्यात ग्रामपंचायत सदस्यांची माळ पडली.
प्रांताधिकारी प्रकाश थगविल तहसीलदार किशोर कदम यांच्या उपस्थितीत येथील प्रशासकीय इमारतीत गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासून निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बेलापूर ग्रामपंचायतीचा सर्व प्रथम, तर टाकळीभानचा सर्वात शेवटी निकाल जाहीर झाला. १३ जागांवर ससाणे-विखे गटास बाजी मारता आली. भानुदास मुरकुटे यांच्या गटास १० ग्रामपंचायतींवर ताबा िमळाला. खोकर येथे दोन्ही गटाला प्रत्येकी पाच, तर मालुंजे येथे चार जागा मिळाल्या. त्यामुळे आता या ठिकाणचे सत्ताकारण अपक्षांवर अवलंबून आहे.

लक्षवेधी ठरलेल्या टाकळीभान, पढेगाव, मातापूर, मालुंजे, निपाणी वाडगाव, महांकाळ वाडगाव, वडाळा महादेव, मुठेवाडगाव, बेलापूर खुर्द ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. निपाणी वाडगाव येथील बाजार समितीचे संचालक मुरली राऊत, ब्राह्मणगाव वेताळचे सरपंच राधाकृष्ण आहेर, बेलापूर सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष सुधीर नवले, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय कुऱ्हे, विखे कारखान्याचे संचालक रामदास देठे यांच्या पत्नी शकुंतला यांना पराभवाला सामोरे जावे लागले. घुमनदेव, भेर्डापूर येथे ससाणे गटाला, तर मुठेवाडगाव मांडवे येथे मुरकुटे गटाला एकही जागा मिळाली नाही. मालुंजे पंचायतीत ससाणे गटाचे, तर मातापूर पंचायतीत मुरकुटे गटाचे अधिक उमेदवार निवडून आले असले, तरी सरपंचपदासाठी राखीव असलेला उमेदवार विरोधी मंडळाकडे असल्याने तेथे राजकीय पेच निर्माण झाला आहे.

प्रवरा परिसरातील मांडवे, कुरणपूर गळनिंब या ग्रामपंचायतींवर विखे गटाने झेंडा कायम राखला. भेर्डापूर ग्रामपंचायतीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेल्या ग्रामविकास मंडळाने सात जागा जिंकून सत्ता मिळवली.
तीन उमेदवारांना मिळाली नशिबाची साथ
खोकर,महांकाळ वाडगाव येथे एक, सराला येथे दोन जागांवर समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठ्या टाकाव्या लागल्या. खोकरच्या लीलावती सिन्नरकर, महांकाळ वाडगाव येथील सुरेखा वानखेडे सरालाच्या शकिरा शेख नसिबा शेख यांना नशिबाने तारले.

मातुलठाण येथे २५ वर्षांनी सत्तांतर
तालुक्यातीलमातुलठाण येथे मागील २५ वर्षांपासून मुरकुटे गटाचे वर्चस्व होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यपदाचे उमेदवार कैलास बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलने मुरकुटे गटाचा धुव्वा उडवत सत्ता मिळवली.
बातम्या आणखी आहेत...