आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Satish Lotake Selection In Akhil Bhartiya Marathi Natya Prishad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्य परिषदेवर नगरचे रंगकर्मी सतीश लोटके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीवर नगरचे रंगकर्मी सतीश लोटके यांची रविवारी निवड झाली. सर्वांना बरोबर घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत. मात्र, उर्वरित महाराष्ट्राला आणखी प्रतिनिधित्व कार्यकारिणीवर मिळायला हवे होते, असे त्यांनी निवडीनंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षांची निवड रविवारी मुंबईत झाली. यावेळी लोटके यांच्यासह नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष अनंत जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते. लोटके म्हणाले, नाट्य परिषदेवर मुंबईचे वर्चस्व असते. या वेळी उर्वरित महाराष्ट्राला बर्‍यापैकी प्रतिनिधित्व मिळाले आहे. तथापि, ते आणखी मिळाले असते ते बरे झाले असते.

मोहन जोशी यांची अध्यक्षपदी झालेल्या निवडीचे अनंत जोशी व कुलकर्णी यांनी स्वागत केले. जोशी यांच्या रूपाने सर्वसमावेशक अध्यक्ष परिषदेला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नगर येथील रंगकर्मी प्रसाद बेडेकर व इतरांनी जोशी यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. जोशी यांच्या मागील अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा अनुभव नगरकरांसाठी अतिशय चांगला आहे.

अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राज्यभरात फिरून सर्व शाखांना भेटी दिल्या, रंगकर्मींच्या अपेक्षा समजावून घेतल्या. आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईत त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला बरोबरीची वागणूक दिली. त्यांच्यामुळे सर्वसामान्य रंगकर्मींना अमेरिकेत जाऊन कला सादर करण्याची संधी मिळाली. मागील कार्यकारिणीत असा अनुभव आला नाही, असे बेडेकर म्हणाले.