नेवासे फाटा - प्रागैतिक इतिहास परिषद व 'दीनमित्र'कार मुकुंदराव पाटील स्मारक समितीतर्फे शनिवारी व रविवारी (८ व ९ फेब्रुवारी) 'सत्यशोधक चळवळीचे इतिहास लेखन' या विषयावर तरवडी (ता. नेवासे) येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्यशोधकीय परंपरेच्या योगदानाची चर्चा व समालाेचन या कार्यशाळेत केले जाणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. गेल ऑम्वेट यांच्या हस्ते होणार आहे.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर हे यावेळी मनोगत व्यक्त करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव पाटील असतील. दुपारी १२ वाजता डॉ. उमेश बगाडे यांचे "सत्यशाेधक ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहास लेखनाचा वस्तूपाठ' या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी १ वाजता "सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीच्या अाकलनाच्या दिशा' या विषयावर प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. सचिन गरूड, प्रा. रणजित परदेशी व प्रा. गणपत उगले यांचे व्याख्यान होईल. रविवारी सकाळी ११ वाजता 'सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ – पद्धतशास्त्रीय आणि सैद्धांती योगदान' या विषयावर डॉ. श्रद्धा कुंभोजकर डॉ. नारायण भाेसले, प्रा. देवेंद्र इंगळे यांचे व्याख्यान होईल. दुपारच्या सत्रात "सत्यशाेधक ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासाची साधने आणि संशोधनाच्या नव्या दिशा' या विषयावर डॉ. उमेश बगाडे यांचे व्याख्यान होणार आहे.या व्याख्यानांना उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.