आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Savarkar Jayanti Celebration Issue At Nagar, Diyva Mrathi

सावरकरांचे विचार आत्मसात केल्यास भारताचा विकास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देश सशक्त होण्यासाठी स्वधर्म, स्वदेशी व स्वभाषा या तीन गोष्टींना प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे, असे मानणार्‍या, हिंदू समाजाच्या एकत्रिकरणासाठी सामाजिक क्रांती करणार्‍या स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांचे विचार आत्मसात केल्याशिवाय भारताचा विकास अशक्य आहे, असे प्रतिपादन विक्रम एडके यांनी केले.
वनवासी कल्याण आर्शमातर्फे सावेडी परिसरात आयोजित कै. ग. म. मुळे व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्याख्यानमालेच्या तिसर्‍या सत्रात ‘आधुनिक भारत व सावरकर’ या विषयावर एडके यांचे व्याख्यान झाले. यावेळी सावरकरांच्या विविध पैलूंबाबत माहिती दिली.
बोलताना एडके म्हणाले, भारतातील राजकीय बदल व नव हिंदू राष्ट्रनिर्मितीची झालेली सुरुवात म्हणजे सावरकरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे. संकटाला संधी मानणारे, देशाला फलदायी मानणार्‍या परराष्ट्र धोरण व युद्धनीतिला प्राधान्य देणारे, लेखण्या सोडून हाती बंदुका घ्यायला सांगणार्‍या सावरकरांचे विचार अनेकांना समजलेच नाहीत.

सावरकरांची वचने, विचार नव्या सरकारने जनतेसमोर आणून एक आधुनिक भारत निर्मितीला सुरुवात करण्याची गरज आहे. वनवासी कल्याण आर्शमाचे जिल्हाध्यक्ष मेघश्याम बत्तीन यांच्या हस्ते एडके यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत मोहोळे उपस्थित होते. सचिव अभय गोळे यांनी स्वातंत्र्य लढय़ातील वनवासी बांधवांच्या योगदानाविषयी माहिती दिली. ओंकार देऊळगावकर याने गीत सादर केले. विद्या पटवर्धन व मीना देशपांडे यांनी पसायदान सादर केले.