आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी करणार २५ लाखांची तरतूद : महापौर कदम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अत्याधुनिक युगात प्रत्येकजण उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करून आपले ज्ञान प्रगत करण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी २५ लाखांची तरतूद करण्याचे आश्वासन महापौर सुरेखा कदम यांनी गुरूवारी दिले.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. महापालिका कर्मचारी कल्याण निधीतून १० वी १२ वीच्या परीक्षेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना महापौरांच्या हस्ते टॅब देण्यात आले. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, आयुक्त दिलीप गावडे, स्थायीचे सभापती सचिन जाधव, सभागृह नेते अनिल शिंदे, उपायुक्त अजय चारठाणकर, भालचंद्र बेहेरे, अशोक साबळे, समिती सचिव शेखर देशपांडे, संगीता झोडगे, सुरेखा सगम, प्रकाश कुरिये, विजय बोधे, अशिराम आढाव आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...