आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांच्या अट्टहासाने वाढतेय दप्तराचे अोझे, शाळांची भूमिका उदासीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पाठीवरील दप्तराचे आेझे कमी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. तथापि, बहुतेक शाळांसह पालकांनी हा आदेश धाब्यावर बसवला आहे. काही शाळा पालक दप्तराच्या ओझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अाहेत. ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी शाळांमध्ये जाऊन दप्तराचे वजन केले असता प्रत्येकाच्या पाठीवर दहा ते पंधरा किलो दप्तराचे आेझे असल्याचे आढळले. शाळांची उदासीन भूमिका पालकांच्या दुराग्रहामुळेच हे ओझे वहावे लागत असल्याचे या पाहणीत निष्पन्न झाले.
स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने सर्वांच्या पुढे असावे, अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण करताना मुलांच्या शाळेच्या दप्तराकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष झाले आहे. दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ‘दिव्य मराठी’ने शाळांमध्ये पाहणी करून दप्तराचे वजन मोजले असता धक्कादायक प्रकार समोर आला. प्रत्येक विद्यार्थी आपल्या पाठीवर दररोज दहा ते पंधरा किलो वजनाच्या दप्तराचे ओझे वहात असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले.
यासंदर्भात मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता पालकांच्या दुराग्रहामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पाल्याला कोणत्याच साहित्याची कमतरता भासू नये, या भ्रमात पालक दप्तरात अनेक अनावश्यक साहित्य भरण्याचा अट्टहास धरतात. शाळेने दप्तराचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्याची छापील प्रतही प्रत्येकाला देण्यात आली आहे. शाळेत येताना आवश्यक पुस्तकेच आणावीत, हा उद्देश त्यामागे आहे. परंतु वेळापत्रक मुलांचे दप्तर तपासण्याकडे पालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुलांना दररोज दहा ते पंधरा किलो वजनाच्या दप्तराचे ओझे पाठीवर वागवावे लागते. त्यामुळे अनेकांना खेळण्या-बागडण्याच्या वयातच पाठीच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे.

नगर शहरातील शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतेक विद्यार्थ्यांच्या पाठीवर अनावश्यक दप्तराचे ओझे लादण्यात येते. त्यामुळे कमीत कमी दप्तराचा उद्देश कधीच मागे पडला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला दिल्या आहेत. परंतु अनेक शाळांनी या सूचनांना केराची टोपली दाखवत पालकांकडे बोट दाखवले. दप्तराचे ओझे कमी करण्याची जबाबदारी आमची नसून पालकांची आहे, असा पवित्रा शाळांनी घेतला आहे. आता पालकांनीच आपल्या मुलांच्या पाठीवरील दप्तराचे अनावश्यक ओझे कमी करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन "दिव्य मराठी'ने केले आहे.

पहिली ते दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या खांद्यावर असेच दप्तराचे ओझे दररोज असते.
बहुतेक शाळांमधील दप्तराचे ओझे १० ते १५ किलो आहे.

दप्तराचे ओझे कमीच हवे
^दप्तराचे आेझेकमी करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. भाऊसाहेब फिरोदिया शाळेने जोड तासिका हा उपक्रम मागील वर्षापासून सुरू केला आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे काही प्रमाणात कमी झाले आहे. विद्यार्थ्यांना कमी जाडीचा पुठ्ठा असलेल्या वह्या वापरण्यास सांगितले आहे. त्यामुळेदेखील काही प्रमाणात ओझे कमी झाले आहे.’’ उल्हासदुगड, मुख्याध्यापक, भाऊसाहेब फिरोदिया शाळा.

असे असावे दप्तराचे वजन
}पहिली (१ िकलो ८०० ग्रॅम) } दुसरी (१ िकलो ७८५ ग्रॅम) } तिसरी (२ िकलो ४०० ग्रॅम) } चौथी (२ िकलो ६८५ ग्रॅम) } पाचवी (३ िकलो १२५ ग्रॅम) } सहावी (३ िकलो १४१ ग्रॅम) } सातवी (३ िकलो ३५७ ग्रॅम) } आठवी (३ िकलो ४२५ ग्रॅम)
भाषा विषयाची पुस्तके दप्तरात असावीत.

वेळापत्रकानुसार दप्तर भरावे
शाळांनी स्वच्छ पाणी दिल्यास वॉटर बॅगचे ओझे कमी होईल.
शालेय पोषण आहार दर्जेदार दिला, तर जेवणाच्या डब्याचेही ओझे कमी होईल.
पालकांनी वेळापत्रकासह दप्तराकडे लक्ष द्यावे; अनावश्यक साहित्य टाळावे.
शिक्षकांनी सर्व पुस्तकांची सक्ती मुलांना करू नये.
दप्तराबाबत शाळांनी पालकांची जागृती करावी.
स्वाध्याय पुस्तिका आठवड्यातून एकदाच न्यावी
जिल्हा परिषदेचा अहवालच संशयास्पद
जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमधील दप्तराचे ओझे तपासले जाते. दैनिक दिव्य मराठीने केलेल्या पाहणीनुसार बहुतेक विद्यार्थ्यांच्या पाठीवर नियमापेक्षा जास्त दप्तराचे आेझे असल्याचे आढळून आले. परंतु शिक्षण विभागाच्या अहवालात ९७ टक्के विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे नियमानुसार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने दप्तराच्या ओझ्याचा अहवाल टेबलावर बसूनच तयार केल्याचा संशय काही जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केला.

जि. प. शाळा एक दिवस दप्तराविना
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवड्यातील एक दिवस (शनिवारी) दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबवला जातो. या व्यतिरिक्त मुलांमध्ये संगणकाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सर्वच शाळा संगणकीकृत केलेल्या आहेत. श्रीरामपूर येथील केशवबन शाळेतील दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करून त्यावर शिक्षण दिले जात आहे. शहरातील खासगी शाळांनीदेखील असा उपक्रम सुरू केला, तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होऊन आनंदायी शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात येईल.

फिरोदिया शाळेचा स्तुत्य उपक्रम
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने मागील वर्षीच सर्व शाळांना दिले आहेत. परंतु बहुतेक शाळांनी या आदेशाकडे पाठ फिरवली आहे. शहरातील भाऊसाहेब फिरोदिया शाळेने मात्र शासनाचे अादेश पाळत ‘जोड तासिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात अवलंबली आहे. आठवड्यातील तासिकांची संख्या तेवढीच ठेवत एका दिवशी एका विषयाचे दोन तास घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या विषयाचे दप्तर विद्यार्थ्यांना आणावे लागत नाही. शहरातील इतर शाळांनीदेखील फिराेदिया शाळेप्रमाणे जोड तासिकांचा उपक्रम राबवला, तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होण्यास मोठी मदत होईल.

असे आहे आेझे
}वीचे दप्तर : ते १० किलो
} वीचे दप्तर: १० ते १२ किलो
} वी ते १० वी : १२ ते १५ किलो
१९८
शहरातीलएकूण शाळा
८२
हजारपहिली ते बारावीचे विद्यार्थी
काय आहे दप्तरात?
}सर्वविषयांची पुस्तके
} स्वाध्याय पुस्तिका
} महागडी कंपास
} मोठी फूटपट्टी
} पाण्याची बाटली
} जेवणाचा डबा
} पॅड वह्या
} अतिरिक्त पेन, खोडरबर इ.

मुख्याध्यापकांना नोटिसा बजावू
^दप्तराचे ओझे मुलाच्या वजनाच्या दहा टक्केच असावे. मुख्याध्यापकांनीच पालकांचे समुदेशन करून मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे नियमानुसार ठेवावे. काही शाळांना आम्ही पत्र पाठवून सूचना दिलेल्या आहेत, जर असे होत नसेल, तर संबंधित मुख्याध्यापकांना आम्ही नोटिसा बजावू. प्रत्येक शाळा व्यवस्थापनाशी आम्ही संपर्क साधत आहोत. शहरातील काही शाळांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.'' गुलाब सय्यद, उपशिक्षणाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...