आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • School Bus Accident Investigation Bya Ahmednagar RTO

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ बसप्रकरणी शाळेला नोटीस; आरटीओंची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अरणगाव येथील वर्का स्कूलच्या बसची मागील चाके अचानक निखळल्याप्रकरणी शाळेकडून ‘त्या’ बसचा अहवाल आणि शालेय परिवहन समितीबाबत माहिती मागवली आहे. तसेच अपघात झालेल्या ‘त्या’ बसला तत्काळ अक्षम असल्याचा शेरा देत शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.

शुक्रवारी दुपारी वर्का स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या एका बसची (एमएच 20 डब्लू 9294) मागील चाके रस्त्यावर अचानकपणे निखळली. हा अपघात स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौकानजीक झाला. या बसमध्ये सुमारे 30 विद्यार्थी होते. चाके निखळल्यानंतर बस एका बाजूला कलंडली. वर्का स्कूलचे प्राचार्य डॉ. रामीन हुसेन यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली होती. दुपार असल्याने रस्त्यावर वाहतूक कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. घटनेनंतर दुसर्‍या स्कूलबसमधून सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, या घटनेची पाहणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दोन अधिकार्‍यांना पाठवले होते. त्यांनी पाहणी करून दिलेला अहवाल कांबळे यांना मिळाला आहे. शाळेच्या बस औरंगाबादला नोंदलेल्या असून शाळेत एकूण 11 स्कूलबस आहेत. अपघात झालेली बस रस्त्यावर चालण्यास सक्षम नसल्याचा तत्काळ शेरा आम्ही दिला आहे. शाळेच्या इतर स्कूलबसेस व स्कूलबस परिवहन समिती स्थापन झालेली आहे किंवा नाही, याबाबतची माहिती आम्ही शाळेकडून मागवली आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही कांबळे यांनी सांगितले.