आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा, कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनांची धूम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील शाळा व कॉलेजमध्ये सध्या स्नेहसंमेलनाची धूम सुरू आहे. स्नेहसंमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने सर्व शाळा व कॉलेजमध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्यांत वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. सध्या त्यांचीच धूम सुरू आहे.

ग्रीन अँपल अँकॅडमी नर्सरी स्कूलच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी गीतांच्या माध्यमातून ‘सेव्ह बेबी गर्ल’चा संदेश दिला. स्नेहसंमेलनानिमित्त शाळेत संगीत खुर्ची, मेहंदी व रांगोळी स्पर्धा, फूड फेस्टिव्हल या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संचालक महेश रच्चा, शरद रच्चा, लीला रच्चा आदी यावेळी उपस्थित होते.

सविता रमेश फिरोदिया प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी सविता फिरोदिया होत्या. निवृत्त न्यायाधीश दिनकर शेलार, व्यापारी दिनेश शिंगवी, सचिव र. धों. शिंगवी, अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, राजेश झालाणी, विश्वस्त रमेश फिरोदिया, दीपक गांधी, बन्सी नन्नवरे, चंद्रकांत आनेचा, एल. के. आव्हाड, कांचन भळगट, शांता कासवा, शैलेश मुनोत, सी. एन. मुनोत, आशा मुनोत, सरसबाई कटारिया, अनिता कटारिया, देविदास खाडे, विजय आमटे आदी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी दाद दिली.

नागापूर येथील काकासाहेब म्हस्के प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन नुकतेच झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी टाळयांच्या गजरात प्रतिसाद दिला. माजी आमदार नरेंद्र घुले, साहित्यिक डॉ. संजय कळमकर, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, एस. बी. कराड आदी उपस्थित होते. घुले म्हणाले, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. त्यांना चांगले नागरिक बनवले पाहिजे. त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केले गेले पाहिजेत.

सावेडीतील र्शीसर्मथ विद्या मंदिर प्रशालेचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा प्रा. डॉ. चं. वि. जोशी, शालेय समितीचे अध्यक्ष विकास सोनटक्के, उपाध्यक्ष भा. ल. जोशी, डी. आर. कुलकर्णी, सचिव ल. दि. सोनटक्के, प्र. स. ओहोळ, ह. वा. इनामदार, सतीशचंद्र कुलकर्णी, विश्वेश भालेराव, किशोर देशपांडे, र्शीपाद कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, डी. एम. कासार, प्रज्ञा तळेगावकर, मुख्याध्यापिका उषा परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रा. डॉ. जोशी म्हणाले, प्राथमिक शाळेपासूनच मुलांवर उत्तम वाचन संस्कार घडवले पाहिजे. वाचन संस्कार हा जीवनाचा मूळ पाया आहे.

सावेडीतील रेणावीकर विद्यालयाचे स्नेहसंमेलन आम्रपाली गार्डन येथे झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे पदाधिकारी शैलेश आपटे होते. मुख्याध्यापिका अलका जोशी, मुख्याध्यापक गजानन वनारसे, मंजुषा करपे आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल उपाध्ये यांनी केले.

भिंगार येथील अ. ए. सोसायटीच्या हायस्कूलचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार होते. प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, सुरेश भालेराव, नंदकुमार झंवर, सुनंदा भालेराव, धनंजय देशपांडे, संजय सपकाळ, व्ही. बी. जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते. सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय व केशवराव गाडीलकर हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.लेखक प्रा. हेमंत गोखले, नगरसेवक बाबासाहेब वाकळे, नगरसेविका मनीषा बारस्कर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष नीलिमा परदेशी, स्वाती गांधी, संस्थेचे अध्यक्ष मधुकर शिंदे, उपाध्यक्ष सुदाम मेहेत्रे, सचिव नामदेव गाडीलकर, सदस्य वसंतराव बेलेकर, विलास साबळे, मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे आदी यावेळी उपस्थित होते