आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन, 'बंद'मध्ये ११० शाळा सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आैरंगाबादयेथे पोलिसांनी शिक्षकांवर केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बुधवारी शाळा बंद ठेवून निषेध नोंदवला. कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली. आंदोलनात ११० शाळा सहभागी झाल्या, असा दावा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने केला आहे.

विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाबाबत शिक्षकांनी मंगळवारी आैरंगाबाद येथे मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या शिक्षकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण पवार, एस. के. गोरे, डी. झेड. कोल्हे, मुख्याध्यापक संघटनेचे सुनील पंडित, अप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, ज्ञानेश्वर बेरड आदी सहभागी झाले होते.

कृती समितीने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आैरंगाबाद येथेे विनाअनुदानित शिक्षकांनी अनुदानाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी शांततामय मार्गाने मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात अनेक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी जखमी झाले.

दरम्यान, बुधवारी विद्यार्थी आणि पालकांना कुठलीही पूर्वकल्पना देता शाळा अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांचे अतोनात हाल झाले. विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनाला माध्यमिक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ, शिक्षक परिषद यासह अन्य शिक्षकांच्या संघटनांनी पाठिंबा दिला, अशी माहिती कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण पवार यांनी दिली.

शिक्षक भारती संघटनेनेही लाठीहल्ल्याचा निषेध केला. संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, शैक्षणिक विचारधारा मोडून नवीन शिक्षण पध्दती रुजवण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. विनाअनुदानित शाळांतील िशक्षकांना वेतन द्यायचे सोडून उलट त्यांच्यावर लाठीहल्ला करण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. लाठीहल्ला करून सरकार शिक्षकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. अनुदानासाठी ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीपासून शिक्षक भारती संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सरकार अनुदान देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा गाडगे यांनी दिला.

महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, मोहम्मद समी शेख, जितेंद्र आरू, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, जया गागरे, संध्या गावडे, बापूसाहेब गायकवाड, अशोक धनवटे, संभाजी चौधरी यावेळी उपस्थित होते.

आंदोलनात ८०० शिक्षक सहभागी
जिल्ह्यातील११०शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या. या शाळांमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना निवेदन दिले आहे.सुमारे ८०० शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षकांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नाही. सरकारने आमच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा.'' श्रीकृष्णपवार, जिल्हाध्यक्ष, कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती.

शिक्षकांवर लाठीहल्ला चुकीचा
सरकारनेआमच्यामोर्चावर लाठीहल्ला करून अन्याय केला आहे. शिक्षकांवर लाठीहल्ला करणे चुकीचेच आहे. वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही सरकार आमच्या रास्त मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारने तातडीने आमच्या मागण्यांबाबत विचार करावा.'' शारदापोखरकर, सदस्य, कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती.
बातम्या आणखी आहेत...