आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-यास पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गणेश सुदाम मोरे (29, कोळगाव, ता. श्रीगोंदे) याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यासंदर्भात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोळगाव येथील कोळाईदेवी विद्यालयात शिकणारी १४ वर्षीय विद्यार्थिनी शाळेतून मळ्यातील घरी परतत असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. शेतातील गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न आरोपीने केला.
मुलीने प्रसंगावधान राखून आरडा-ओरड केल्याने शेतात काम करणारे आजूबाजूचे लोक धावले. त्यांनी मुलीची सुटका केली. 12 फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला. रात्री बेलवंडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्याच दिवशी मध्यरात्री गणेश मोरे या आरोपीला बेलवंडी पोलिसांनी अटक केली. त्याला 13 फेब्रुवारीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बेलवंडी पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.