आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरात शालेय गणवेशांसाठी 1 कोटी 9 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना विशेष घटक व इतर योजनांतून गणवेश व शालेय साहित्य वाटपासाठी 1 कोटी 39 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिक्षण समितीच्या सभेत शुक्रवारी याबाबत निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गणवेश खरेदीबाबत यावेळी चर्चा झाली. 2013-2014 या वर्षासाठी प्राथमिक शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी गणवेश व शालेय साहित्य वाटण्यात येणार आहे. विशेष घटक योजनेतून 103 विकासगटांतील विद्यार्थ्यांसाठी 1 कोटी 9 लाखांचे गणवेश, तर 27 लाख 33 हजारांचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीबरोबरच दप्तर नेण्यासाठी पिशवी खरेदी करावी, अशी सूचना सदस्यांनी मांडली. ही खरेदी करताना दराची व गुणवत्तेची खातरजमा करावी अशा सूचना राजळे यांनी केली. सर्वशिक्षा अभियानांतर्गत बांधकाम पूर्ण झालेल्या शाळांची पाच टक्के रक्कम पंधरा दिवसांत अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सदस्य अँड. आझाद ठुबे यांनी संगणक प्रयोग शाळेसाठी दिलेल्या साहित्याची किंमत 14 लाख आहे. वास्तविक प्रयोगशाळेसाठी खरेदी केलेल्या साहित्याचा दर्जा निकृष्ट असून ते चढय़ा दराने खरेदी झाल्याचा आरोप ठुबे यांनी सभेत बोलताना केला. त्यावर अधिकार्‍यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.