आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांना सापडेना गणवेशाचा रंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश असावा, असे आवाहन जि. प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी शाळा व्यवस्थापन समित्यांना काही दिवसांपूर्वी केले होते. पण सर्वच शाळांच्या पसंतीचा रंग अधिकारी पदाधिकारी दोघांनाही आजतागायत सापडला नाही. समित्यांचा प्रतिसाद मिळाल्याने एकच रंगाचा गणवेश ठेवण्याचा उपक्रम फसला आहे.
अधिकाचा‘ यू टर्न’
काहीदिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असावा, असा सूर अधिकानी पदाधिकाबरोबर आळवला. पण एक गणवेश होण्याची आशा धूसर झाल्याने अधिकानीच यू-टर्न घेत एक गणवेश झाला, तर पुन्हा जिल्हा परिषदेचीच शाळा वाटेल. त्यामुळे गणवेशाचा निर्णय समितीने घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जि. प. शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम सूचवले आहेत. यामध्ये आठवड्यातून एक दिवस दप्तरमुक्त शाळा हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

जि. प. शाळांमध्ये पांढरा शर्ट आणि खाकी पँट असा गणवेश आहे. पण आता खासगी शाळांशी स्पर्धा करताना गणवेशही बदलावा लागेल, असा सूर अधिकारी पदाधिकानी आळवला. गणवेश खरेदीसह त्याचा रंग याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीचा आहे.
जिल्हा परिषदेच्या हजार ६०० शाळा असून या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी, दप्तरमुक्त शाळा, अद्ययावत प्रशिक्षण, तसेच संबंधित शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. हे करत असताना गणवेश एकसारखा असावा, यासाठी काही दिवसांपूर्वी उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शेलार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अधिकारी पदाधिकानी सर्व शाळांसाठी एकाच रंगाचा गणवेश असावा, असे आवाहन केले. त्यासाठी विविध रंगाचे गणवेश सभागृहात दाखवण्यात आले. पण कोणत्या रंगाचा गणवेश ठेवायचा या विषयावर एकमत झाले नाही. त्यामुळे हा विषय लांबणीवर पडला. आता शाळा सुरू झाल्या आहेत. गणवेशाचा रंग कुणालाही सापडला नाही.

आम्ही आदर्श घडवू...
गणवेशाच्या रंगाचा नमुना गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुखांपर्यंत पोहोच झाला आहे. जिल्हाभरातून आमच्या ावाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. थोड्याच दिवसांत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकसारखा गणवेश दिसेल. आम्ही जिल्हाभर एकच गणवेश ठरवून आदर्श घडवून दाखवू.'' अण्णासाहेबशेलार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.

रंगाचा निर्णय शाळा व्यवस्थापनाचा
जिल्हापरिषदांच्या शाळांचा गणवेश कोणत्या रंगाचा असावा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीचा आहे. एकच रंग सर्व शाळांना असेल, तर पुन्हा जिल्हा परिषदेची शाळा असे होईल. पण कोणत्या रंगाचा गणवेश असावा याचे कोणतेही परिपत्रक प्रशासनाने काढलेले नाही.'' अशोककडूस, जिल्हा शिक्षणाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...