आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रज्ञांकडून बोटा परिसराची पहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - बोटापरिसरातील भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका सुरूच आहे. नाशिक येथील मेरी संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाने आणि तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी बुधवारी या भागाची पाहणी केली. सौम्य धक्के बसत असले, तरी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. 

नगर पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील बोटा, घारगाव या गावांसह माळवाडी, केळेवाडी, कुरकुटवाडी, आंबी, तळपेवाडी, आळेखिंड परिसरासह पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेफाटा आणि नजीकच्या गावांना काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. आतापर्यंत तीन धक्क्यांची नोंद नाशिकच्या भूकंपमापक यंत्रावर झाली. सोमवारी रात्री जाणवलेल्या धक्क्यानंतर एका ठिकाणी जमिनीखालून द्रवरुप पदार्थ वर आला. जळालेले दगडही आढळले. तहसीलदार सोनवणे यांनी याची माहिती शास्त्रज्ञांना दिली. त्यामुळे मेरीच्या पथकाने बुधवारी भेट दिली. मागील पंधरा दिवसांपासून जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने प्रबोधन मोहीम हाती घेतली आहे. भूकंपामुळे धोक्याची स्थिती निर्माण झाली, तर काय उपाययोजना करायच्या याची माहिती देण्यात येत आहे.