आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगारातील तोफगोळ्याच्या स्फोटात तरूणाचा मृत्यू , तर महिला जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या भंगारातील तोफगोळ्याच्या स्फोटात अविनाश ऊर्फ अनिल पतारे (23 वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला, तर हौसाबाई बाजीराव तांबे (52) ही महिला गंभीर जखमी झाली.

आशिया खंडातील सर्वांत मोठे युद्धसराव क्षेत्र असलेल्या लष्कराच्या केके रेंजलगत खारेकर्जुने गाव आहे. रणगाड्यांच्या सरावानंतर डागलेल्या तोफगोळ्यांचे भंगार गोळा करण्याचा येथील अनेकजणांचा बेकायदेशीर व्यवसाय आहे. लष्कराने नियुक्त केलेला ठेकेदार असतानाही ग्रामस्थ घुसखोरी करून जीवाची पर्वान करता हे भंगार जमा करतात. जमा केलेल्या या भंगारातील तोफगोळ्याचा स्फोट झाल्याने काही लोकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजता असाच स्फोट होऊन महिला व युवक जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.