आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सी प्लेन येणार, अवघ्या दीड तासात गाठा राहुरीहून मुंबई!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी- शिर्डी व शनिशिंगणापूर येथे वाढत असलेल्या पर्यटनाचा लाभ राहुरीला होण्यासाठी मुळा धरणाचा उपयोग करून समुद्री विमानसेवा (सी प्लेन) सुरू करण्याबाबतचे प्राथमिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले. तरंगत्या विमानसेवेच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीस अखेर यश आले आहे. ही विमानसेवा प्रत्यक्षात आल्यास नगर व राहुरीच्या नागरिकांना दीड तासात मुंबईला जाता येईल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मेरिटाइम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेसच्या सहकार्याने मुंबई येथून मुळा धरण, तसेच नाशिक, पुणे येथे समुद्री विमान सेवा सुरू करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. प्राथमिक सर्वेक्षणासाठी कंपनीच्या अधिकाºयांनी नुकतीच मुळा धरण परिसराला भेट दिली. माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी पर्यटन विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा करून ही विमानसेवा सुरू करण्याचा आग्रह धरला होता. कंपनीच्या अधिका-यांकडेही त्यांनी विचारणा केली होती. अखेर या प्रस्तावावर विचार होऊ न दोघांच्याही संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठीचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यासाठी येत्या दोन महिन्यांत तज्ज्ञांची समिती मुळा धरणास भेट देणार आहे.
आसनक्षमता 8 आणि 15- ‘सी प्लेन’ ही उच्च् दर्जाची विमानसेवा भारतात 14 फेबु्वारी 2011 रोजी अंदमान-निकोबार बेटांवर सुरू करण्यात आली. दोन पायलट व आठ वा पंधरा आसनी प्रवासी क्षमतेचे हे विमान असते.
सात ठिकाणे रडारवर - गिरगाव चौपाटी, पवना डॅम, अप्पर वैतरणा (लोणावळा), मुळशी धरण (पुणे), हरिहरेश्वर, गणपतीपुळे व तारकर्ली येथेही अशी सेवा सुरू करण्याचा विचार चालू आहे.
साईभक्तांना लाभ- शिर्डीजवळ विमानतळ सुरू होण्यापूर्वीच ही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता असून अवघ्या दीड तासात राहुरी ते मुंबई हा प्रवास पूर्ण करता येईल. या सेवेचा लाभ शनी व साईभक्तांना होणार असून हवाई सेवेमुळे राहुरी जगाच्या नकाशावर येणार आहे.
पाटबंधारेचीही ‘ना हरकत’ - तांत्रिक समितीने मान्यता दिल्यास ‘द केस्सेना 208 ए-सी- प्लेन’ ही समुद्री विमानसेवा सुरू करता येऊ शकेल. यासाठी पर्यटन महामंडळाच्या विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांचे, तसेच हॉटेल्सचे सहकार्य कंपनीच्या सेवा पुरवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचा करार मेहेर व पर्यटन विकास महामंडळ यांच्यात करण्यात आला असून पाटबंधारे विभागानेही अशी सेवा सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र त्यांच्या वरिष्ठांकडे सादर केले आहे.
वाहतूक कोंडीत अडकले शिर्डी; पर्यायी मार्गाकडे दुर्लक्ष्