आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही ‘बंद’, पाच हजार २९८ व्यापाऱ्यांना नोटिसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्य सरकारने भाजीपाला आणि फळे बाजार समितीच्या नियमनातून वगळल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील आडत व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बंद पुकारला आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी हा बंद सुरूच होता. दरम्यान, ‘बंद’मध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील पाच हजार २९८ आडत व्यापाऱ्यांना मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने बाजार समित्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

‘बंद’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले, उपसभापती नारायण आव्हाड, तालुका उपनिबंधक राम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पोपटलाल बोथरा, निखील वारे, शांतीलाल गांधी, प्रेम पितळे, दिलीप भालसिंग, रेवण चौभे, नंदकुमार शिकरे, राजेंद्र बोथरा, अभय भिसे आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर सभापती कर्डिले कुलकर्णी यांनी शासन आदेशाचे पालन करुन बाजार पुन्हा सुरु करण्याचे आवाहन केले.त्यावर आडत व्यापाऱ्यांनी दोन दिवसांचा कालावधी मागितला. बुधवारी राज्यव्यापी बैठकीनंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचे व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी संतोष सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान, बंद सहभागी झालेल्या जिल्ह्यातील हजार २९८ आडतदारांना बाजार समितीने नोटिसा बजावल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी-विक्री करावी, शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्यास संबंधित आडते व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असे नोटिशीत म्हटले आहे.

आडते व्यापाऱ्यांच्या ‘बंद’मुळे भाज्यांचे भाव सध्या कडाडले आहेत. मंगळवार बाजारात बटाटे ३० रुपये किलाेने विकले जात होते. छाया : उदय जोशी
बातम्या आणखी आहेत...