आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांची निवड जनतेतून करा, महापौर सुरेखा कदम यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-  नगराध्यक्ष, सरपंचाप्रमाणे महापौराची निवडदेखील थेट जनतेतून करावी, अशी मागणी महापौर सुरेखा कदम यांनी मुंबईत राज्य महापौर परिषदेत केली. विकासकामांसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार महापौरांना असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंधेरी येथील कार्यालयात महाराष्ट्र महापौर परिषद पार पडली. या परिषदेत महापौर कदम यांनी विविध प्रश्न मांडले. महापौरांची निवड नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी महापौरांची निवड थेट जनतेतून करणे आवश्यक आहे. महापौरांना विविध कामे मार्गी लावताना अडचणींना तोंड द्यावे लागते. आयुक्तांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावे लागतात.

अनेकदा आयुक्तांकडून सहकार्य मिळत नाही. अशा वेळी महापौरपद हे केवळ शोभेपुरतेच उरते. त्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार महापौरांनाच असावेत, अशी अपेक्षा कदम यांनी परिषदेत व्यक्त केली. वर्ग महापालिकांना विशेष निधी देण्याची मागणीही कदम यांनी केली. नगरपालिका असताना शिक्षण मंडळाला ८० टक्के अनुदान मिळत होते, परंतु आता हे अनुदान केवळ ५० टक्केच मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...