आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे महत्त्वाचे- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. कोलते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कमीत कमी खर्चात रुग्णांना व्याधीमुक्त करण्यासाठी डॉक्टरचे मन खूप मोठे लागते. डॉ. आशितोष जोशी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत अत्यंत कमी खर्चामध्ये अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे. जोशी हॉस्पिटलचा सामाजिक बांधिकीचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. गुडघे दुखीने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करून त्यांना जगण्याचा नवीन दृष्टिकोन देणे आवश्यक असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. शरद कोलते यांनी नुकतेच केले.
केडगावच्या जोशी हॉस्पिटल जॉइंटस् रिप्लेसमेंट सेंटरमध्ये आयोजित गुडघा आणि खुबा सांधेबदल शस्त्रक्रिया शिबिराच्या समारोपानिमित्त गुडघाबदली आॅपरेशन झालेल्या पेशंटची चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजयी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉ. कोलते यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब आॅफ अहमदनगरचे अध्यक्ष अमृत कटारिया होते. क्लबचे सेक्रेटरी उमेश रखे, माजी प्रांतपाल शिरीष रायते यांच्यासह आॅपरेशन झालेले रुग्ण त्यांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.